एन.ए. परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धावण्याची गरज संपली !
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. यानुसार, आता कृषी जमिनीचा बिगर कृषी (एन.ए.) वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची अट संपुष्टात आली आहे. आता नगर नियोजन विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा मंजुरी हीच एन.ए. परवानगी मानली जाईल. त्यामुळे नागरिकांना…