November 7, 2026 9:19 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » धारदार वस्तूने पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास

धारदार वस्तूने पिशवी कापून सोन्याचे दागिने लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

लग्नासाठी पाळधी येथे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून धावत्या बसमध्ये चोरट्यांनी तब्बल ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकारात महिलेचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील बारी वाडा भागातील रहिवासी सुनीता अशोक बारी (वय ५२) या जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसने पाळधी (पहूर) येथे लग्नासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील कापडी पिशवी धारदार वस्तूने कापून त्यातील दागिने लंपास केले. चोरट्यांनी पिशवीत ठेवलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (पेंडंटसह) तसेच ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असा एकूण ३८ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरून नेला. चोरीची घटना लक्षात येताच महिलेने तत्काळ तक्रार दाखल केली.

याप्रकरणी सुनीता बारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार भटू पाटील करीत आहेत. दरम्यान, धावत्या बसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!