शहरात काढली तिरडीतील प्रतिकात्मक अंत्ययात्रा; शिवरायांचा अपमान सहन न होणार, भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
जळगाव : प्रतिनिधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाने रविवारी जळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भारतीय जनता पक्षाच्या जुने वसंत स्मृती कार्यालयापासून या…