पाळधीत पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी, २ ची प्रकृती गंभीर
जळगाव | १६ मार्च प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे पर्यटन विकास प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अचानक स्लॅब (साचा) कोसळल्याने ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प…