जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अतिक्रमण कारवाईत होत असलेल्या कथित भेदभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने जळगाव महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे. खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्य विक्री सुरू असतानाही अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा…