महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक; नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा निर्धार
जळगाव | प्रतिनिधी जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीसंदर्भातील विविध बाबींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, भाजप महानगर…