शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; मावळ्यांच्या भव्य शिल्पांनी चौक सजला
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या जळगाव शहरातील शिवतीर्थ चौकाच्या सौंदर्यात आता आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील दुभाजकावर शिवकालीन मावळ्यांची भव्य आणि आकर्षक शिल्पे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकाला ऐतिहासिक, देखणे आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हे शिल्पसमूह विशेष लक्ष वेधून…