ईद-ए-मिलादसाठी जळगाव पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ५,६०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी जळगाव पोलिस मुख्यालयात शांतता समितीचे सदस्य आणि मिरवणूक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, सर्व…