जळगाव बायपासवर काळाचा घाला! भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी
जळगाव | नाशिक येथे रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने जळगाव बायपासवर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी असोदा ते ममुराबाददरम्यानच्या बायपासवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनातून…