‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव आणि वामिका गब्बी जळगावकर रसिकांच्या भेटीला!

जळगाव, दि. ९ ऑक्टोबर : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम हे रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव शहरात उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने जळगावकर रसिकांना बॉलिवूड कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या […]
जळगावात महापौरांच्या शासकीय वाहनावर रॉडने हल्ला; अतिक्रमण कारवाईनंतर महापालिकेत गोंधळ

जळगाव : शहरातील टॉवर चौक परिसरात रसवंतीच्या गाडीवर अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर संतप्त झालेल्या एका तरुणाने महापालिका आवारात येऊन महापौर दीपमाला काळे यांच्या शासकीय वाहनावर रॉडने प्रहार केल्याची घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी घडली. या प्रकारामुळे महापालिका परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. रसवंतीची गाडी जप्त […]