जळगाव : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत 5 ऑक्टोबर 2026 रोजी वाढदिवसानिमित्त ५८व्यांदा रक्तदान करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च न करता रक्तदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सलग ५८ वेळा रक्तदान करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी गिरीश महाजन साहेब वैद्यकीय सहायता कक्ष तसेच आमदार अमोल दादा जावळे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ असून, प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Author: K P Chavan
thepubliclive


