जळगावात आजपासून पाणीपुरवठा केवळ ७५ मिनिटे; वाघूरचा साठा जपण्यासाठी महापालिकेचा निर्णय

जळगाव : वाघूर जलाशयातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जळगाव महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (ता. १७) शहरात दीड तासांऐवजी एक तास १५ मिनिटेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पाण्याच्या उपशात दहा टक्के कपात करण्याच्या नियोजनातून ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उपलब्ध वेळेत पाण्याचा वापर जपून करावा लागणार […]