अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील शेतात लाकडे तोडायला गेलेल्या २२ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता पीडित महिला शेतात लाकडे तोडत असताना गोविंद युवराज भिल हा तेथे आला. महिलेने त्याला लाकडाची मोळी डोक्यावर ठेवण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. घाबरलेली महिला लाकडे टाकून तत्काळ घरी परतली व नातेवाइकांना प्रकार मारवड पोलिसांनी गोविंद युवराज भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
