जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरातील भागात राहणाऱ्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पिडीत महिला घरात झोपलेली असतांना, संशयित आशिष पांडूरंग जोहरे (रा. पिंप्राळा) याने महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. तसेच तीला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समोर समोर आल्यानंतर पिडीत महिलेने रामांनद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी आशिष पांडूरंग जोहरे (रा. पिंप्राळा, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.


