चाळीसगाव | २६ मे: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी सोमवार,रोजी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी व पातोंडा गावांना भेट देऊन घरकुल योजनांची अंमलबजावणी तपासली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वाघळी येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप कार्यक्रमात सहभाग घेतला. लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळूचे मोफत वितरण करण्यात आले.

पातोंडा गावात भेट देऊन तेथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. कामाची सविस्तर माहिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

ग्रामपंचायत कार्यालयाचीही पाहणी करत त्यांनी कार्यालयीन स्थितीची माहिती घेतली. घरकुल योजनांची कामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या दौऱ्यात संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *