यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव येथे बसस्थानकावर बसमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गोंधळात होऊन ५१ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना एका गावात बुधवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय महिला आपल्या मुलासह बसस्थानकावर बसमधून उतरत असताना वाद निर्माण झाला. या वादादरम्यान विशाल पाटील, यश साळुंखे, उदय चव्हाण, मयूर कोळी, यशवंत कोळी व भूषण खंबायत (सर्व रा. किनगाव) यांनी महिला व तिच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर महिलेने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत



