September 20, 2026 3:41 pm

अजित पवार विमान अपघातप्रकरणी नवे प्रश्न; मुख्य वैमानिकावर रोहित पवार यांचा संशय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत सखोल आणि जलद चौकशीची मागणी केली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरणाद्वारे अपघातासंदर्भातील विविध मुद्दे उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले की, अपघाताच्या काही क्षणांपूर्वी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचा […]

व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला ‘दादां’ना प्रेमाचा सलाम; अमोल मिटकरींचे भावनिक पत्र चर्चेत

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला पंधरा दिवस उलटले असले, तरी त्यांच्या जाण्याची पोकळी कार्यकर्त्यांच्या मनातून अद्याप भरून निघालेली नाही. अनेकांना अजूनही ते आपल्या सभोवतालीच असल्याचा भास होतो. पत्रकार परिषदेत अचानक उपस्थित राहतील, सभेत एखाद्याला खडसावतील किंवा कार्यकर्त्यांच्या गराड्यात ठाम भूमिका मांडतील, अशी भावना अनेकांच्या मनात दाटून येत आहे. या […]

नांदेडमध्ये दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के !

पुणे : वृत्तसंस्था मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुखेड तालुक्यातील 7 ते 8 गावांमध्ये सुमारे दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी जमिनीतून गूढ आवाज आला आणि जमीन हलल्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज आदी गावांमध्ये नागरिकांनी अचानक झालेल्या आवाजामुळे घराबाहेर धाव घेऊन मोकळ्या […]

30-35 आमदारांनी बाजू विलीनीकरणाची घेतली – हिरामण खोसकर

मुंबई : वृत्तसंस्था अजित पवारांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवशीच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 ते 35 आमदार विलीनीकरणाच्या बाजूने असल्याचा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे पक्षातील विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या […]

इंजिनिअरिंग करूनही 10 हजार पगार; डिलिव्हरीत 30 हजारांची कमाई

नाशिक : वृत्तसंस्था हातात इंजिनिअरिंग, एमबीए किंवा फार्मसीची पदवी आणि एसी केबिनमध्ये बसून करिअर घडवण्याचे स्वप्न… मात्र वास्तव वेगळेच चित्र दाखवत आहे. नाशिक शहरातील अनेक उच्चशिक्षित तरुण आज भरउन्हात दुचाकीवरून वस्तू आणि फूड पार्सलची डिलिव्हरी करताना दिसत आहेत. अपेक्षित वेतन आणि सन्मान न मिळाल्याने त्यांनी ‘कॉर्पोरेट’ नोकरीऐवजी कमिशनआधारित डिलिव्हरीचे काम स्वीकारले आहे. शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये […]

जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ !

डिजिटल युगाचे सुरक्षा कवच: जळगावमध्ये रंगणार ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’! जळगाव : प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. हा एक्स्पो […]

२५ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी मोबाईल स्विच ऑफ करीत घराच्या दुसऱ्या मजल्यावर मोहीत किरण जोशी (वय २५, रा. नवीन जोशी कॉलनी) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन जोशी कॉलनीत मोहीत जोशी हा […]

५१ वर्षीय महिलेचा विनयभंग : सहा जणांवर गुन्हा दाखल !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथे बसस्थानकावर बसमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गोंधळात होऊन ५१ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना एका गावात बुधवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय महिला आपल्या मुलासह बसस्थानकावर बसमधून उतरत असताना वाद निर्माण झाला. या वादादरम्यान विशाल पाटील, यश […]

भुसावळात भरदुपारी किरकोळ वादातून अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रजा टॉवर चौकात भरदुपारी किरकोळ वादातून चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगा व एक तरुणावर वार करण्यात आल्याने दोघे जखमी झाले आहेत. जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रजा टॉवर चौकात एक तेरा वर्षीय मुलगा आणि […]

संगीताची आवड असलेल्यांना आज एखाद्या मोठ्या कार्यक्रमात गाण्याची ऑफर मिळू शकते.

आजचे राशिभविष्य दि.१३ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या सामाजिक सुधारणांसाठी तुमचे शेजारी तुमची प्रशंसा करू शकतात आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या रूपात नवीन पाहुण्यांचे आगमन तुमच्या घरात आनंदाचे वातावरण आणेल. या राशीखाली जन्मलेल्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. जोडीदारसोबत बाहेर जेवायला जायचा प्लान ठरेल. वृषभ राशी कलांमध्ये रस असलेल्यांसाठी आजचा दिवस […]

error: Content is protected !!