जळगाव: जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विनोद शांताराम पाटील (वय ५०) यांचे आज शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.
काल बैलपोळ्याच्या सुट्टीच्या दिवशी शासकीय निवासस्थानी असताना त्यांना मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमेरेज) झाला. घरच्यांनी त्यांना भंगाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उद्या रविवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे.

Author: K P Chavan
thepubliclive