September 29, 2026 4:29 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनोद पाटील यांचे निधन

जळगाव: जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विनोद शांताराम पाटील (वय ५०) यांचे आज शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. काल बैलपोळ्याच्या सुट्टीच्या दिवशी शासकीय निवासस्थानी असताना त्यांना मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमेरेज) झाला. घरच्यांनी त्यांना भंगाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते; […]

आनंददायी शनिवारी शेठ ला.ना. सा.विद्यालयात भरली दप्तरमुक्त शाळा

जळगाव : प्रतिनिधी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात,शनिवार दिनांक 2 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार व उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत जगताप सर यांच्या संकल्पनेनुसार आनंददायी ,दप्तरमुक्त शाळा भरविण्यात आली.या प्रसंगी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना. विविध शैक्षणिक साहित्याची ओळख करून दिली.     तसेच विद्यार्थ्यांमधील कृतीशीलतेला वाव मिळावा या हेतूने विविध अभ्यासपूरक […]

परप्रांतीय तरुणाची राज ठाकरेंना शिवीगाळ : मनसे कार्यकर्ते आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा मराठी-हिंदी वाद सुरु झाला असून आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे अंधेरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असे […]

“चमोली जिल्ह्यात ढगफुटीने थैमान; थरालीत घरांचे मोठे नुकसान, 2 जण बेपत्ता”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडमधील चमोलीच्या थराली येथे मध्यरात्री ढगफुटीची घटना घडली आहे. येथे मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले असून यात 2 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन […]

संतप्रेमातून समर्पणापर्यंत : आरिफ खानच्या किडनीदानाचा मानवी मुल्यांना सलाम”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी येथील रहिवासी असलेल्या आरिफ खान चिश्ती या मुस्लीम तरुणाने संत प्रेमानंद महाराज यांना आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरिफने संत प्रेमानंद महाराजांना पत्र लिहून आपली भावना मांडली असून, या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. आरिफ खान चिश्ती हा इटारसी (नर्मदापुरम, […]

हनी ट्रॅपचा खेळ पुन्हा उघड; लोढाच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेला प्रफुल्ल लोढा याच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात एका ३६ वर्षीय महिलेनं त्याच्याविरोधात बलात्काराची गंभीर तक्रार दाखल केली आहे. ही घटना २७ मे २०२५ रोजी बालेवाडीतील एका नामांकित हॉटेलमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात लोढानं पीडितेच्या पतीला नोकरी […]

पुढील २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात कोसळणार पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात वादळाची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचा आणि स्थानिक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने‎ देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम […]

मोठी बातमी : रोहित व विराट होणार निवृत्त?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. ते दोघेही अजून एकदिवसीय सामने खेळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या दोन्ही स्टार खेळाडूंच्या भवितव्याबद्दल अनेक […]

धक्कादायक : आईला धमकावत अल्पवयीन मुलीचे लग्न !

जळगाव : प्रतिनिधी सहा वर्षीय मुलाला जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन लेकीचा विवाह लावल्याचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या आईने अडीच महिन्यांनंतर प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या लेकीच्या विवाह सोहळ्याला खुद्द फिर्यादी आईच उपस्थित होती, ही बाब तपासात निष्पन्न होत गेल्यावर आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मात्र, फिर्यादी महिलेने ‘चाइल्ड हेल्पलाइन’ला संपर्क केल्यानंतर […]

पाचोरा हादरले : दहावीच्या विद्यार्थिनीला शेतात नेवून स्कूल बसचालकानेच केला बलात्कार !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात गेल्या महिन्यात दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  घडली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्कूल बसने ये-जा करतात. गेल्या महिन्यात अबिद हा दुचाकीने संबंधित मुलीच्या गावात आला होता. तेव्हा ही मुलगी बाहेर जात असताना […]

error: Content is protected !!