October 13, 2026 4:17 am

Home » जळगाव » उपमहापौर मनोज चौधरींची अनोखी भक्ती! शिरागड ते जळगाव धावत आणली ज्योत

उपमहापौर मनोज चौधरींची अनोखी भक्ती! शिरागड ते जळगाव धावत आणली ज्योत

जळगाव | प्रतिनिधी : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी अनोख्या भक्तीचे दर्शन घडवले. शिरागड येथून प्रज्वलित करण्यात आलेली पवित्र ज्योत वाहनाऐवजी स्वतः धावत जळगावपर्यंत आणत त्यांनी देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

जळगावमधील गुजराल पेट्रोल पंप परिसरात आयोजित विशाल सांस्कृतिक दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या देवीच्या स्वागतासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी हा संकल्प केला होता. त्यानुसार शिरागड येथून ज्योत घेऊन ते जळगावच्या दिशेने धावत आले. त्यांच्या या उपक्रमात मंडळाचे सदस्यही सहभागी झाले होते.

शिरागड ते जळगावपर्यंत पवित्र ज्योत अखंड ठेवत ती धावत आणण्याच्या या उपक्रमातून श्रद्धा, भक्ती आणि देवीप्रती असलेली निष्ठा व्यक्त झाली. नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक परंपरा जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.

देवीच्या स्वागतासाठी केलेला हा अनोखा संकल्प भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!