Home » जळगाव » गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुससह तरुण अटकेत !

गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुससह तरुण अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

पोलिसांना पाहताच निघून जात असलेल्या स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकूर (वय २२, रा. शंकरराव नगर) याच्याकडून शनिपेठ पोलिसांनी गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी रात्री शंकरराव नगर परिसरात करण्यात आली. या प्रकरणी स्वप्निल ठाकूर याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शंकरराव नगर परिसरात स्वप्निल ठाकूर हा गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी पोउनि योगेश ढिकले, पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, पोकॉ रवींद्र साबळे, नीलेश घुगे, नवजीत चौधरी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *