Home » जळगाव » जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आर्थिक साक्षरतेवर व्याख्यान व कॅमेरा पुजन !

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आर्थिक साक्षरतेवर व्याख्यान व कॅमेरा पुजन !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील असलेलं वैविध्य पर्यटन आणि विकास याकडे केवळ जिल्ह्यातीलच नागरिकांचे लक्ष नाही तर राज्यातील इतरही जिल्ह्याचे लक्ष असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवर इतर राज्यातील देशातील प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांवर जिल्ह्याचं सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडण्याचं एक चांगलं आवाहन निर्माण झालं आहे. त्याचा योग्य लाभ घेऊन आपण काढलेलं सुंदर छायाचित्र मला वैयक्तिक पाठवा मी ते फेसबुक पेजवर प्रकाशित करेल आणि जिल्ह्याच्या प्रगतीला आपण हातभार लावूया, असे प्रेरणादायी आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन जळगाव तर्फे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बढे कॅपिटलचे संचालक ज्ञानेश्वर बढे प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधिपाल वानखेडे, यांच्या हस्ते कॅमेरापुजन करण्यात आले. भैरवी पलांडे-वाघ, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.

आर्थिक साक्षरता या विषयावर ज्ञानेश्वर बढे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. फोटोग्राफर बांधव पैसे कमावतो मात्र योग्य गुंतवणूक कुठे करावी याबाबत ते अनभिज्ञ होते. याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे असा उद्देश प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृत्तपत्र छायाचित्रकार आणि व्यावसायिक छायाचित्रकार बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. सभागृह पुर्णपणे भरलेले होते.

कार्यक्रमाला वृत्तपत्र छायाचित्रकार सचिन पाटील, गोकुळ सोनार, नितीन सोनवणे, आबा मकासरे, जेष्ठ छायाचित्रकार शब्बीर सय्यद, मनपाचे फोटोग्राफर वैभव धर्माधिकारी, कवयित्री बहिणबाई चौधरी विद्यापिठाचे फोटोग्राफर शैलेश पाटील, पोलिस फोटोग्राफर जयंत चौधरी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे फोटोग्राफर अभिषेक मकासरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे रिटायर फोटोग्राफर सुरेश सानप, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे फोटोग्राफर राजु माळी, व्यावसायिक फोटोग्राफर संघटनेचे प्रकाश मुळे, नितीन थोरात, रूपेश महाजन, उदय बडगुजर, संदिप याज्ञिक, राजु जुमनाके, उमेश चौधरी, प्रविण गायकवाड, निखिल सोनार, बंटी बारी, चित्रनिश पाटील, विनोद बारी, अतुल वडनेरे, रोषण पवार, जितेंद्र टेकावडे प्रादेशिक न्युज चॅनलचे प्रतिनीधी चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, वाल्मिक जोशी, नितीन नांदुरकर, सचिन गोसावी, युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी काशिनाथ चव्हाण, अयाज मोहसिन, सतीश सैदाणे, विक्रम कापडणे, नाजनीन शेख, चेतन वाणी, सुनिल भोळे, जकी अहमद, निखिल वाणी, योगेश चौधरी, संदिप महाले, विकास पाथरे, दिपक सपकाळे, संदिप होले, कल्पेश वाणी,

यावेळी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे हेमंत पाटील, सचिन पाटील, जुगल पाटील, पांडुरंग महाले, अरूण इंगळे, भुषण हंसकर, भुषण पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेनहत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे सचिव अभिजीत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमित देशमुख यांनी केले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *