Home » जळगाव » १९ वर्षीय विद्यार्थ्याने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

१९ वर्षीय विद्यार्थ्याने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव :  प्रतिनिधी

बी. फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या श्याम प्रभाकर पाटील (१९, रा. बोदवड, ह.मु. दौलतनगर) या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील एका खासगी महाविद्यालयात बी-फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो दौलतनगरात मित्रासोबत खोली करून राहत होता. रविवारी त्याचा मित्र बाहेर गेलेला असताना श्यामने गळफास घेतला. त्याचा मित्र आला, परंतु दरवाजा आतून बंद होता. प्रतिसाद मिळत नसल्याने तरुणाने घर मालकाला सांगितले. दरवाजा तोडला असता, श्याम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *