Home » जळगाव » २२ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

२२ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कुसूंबा येथे एका २२ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना गुढीपाडव्याच्या सणादिवशी (दि. ३० मार्च) उघडकीस आली असून, या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा) असे असून, तो एमआयडीसीतील एका कंपनीत चटई कामगार म्हणून कार्यरत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो मेहनत करीत होता. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यानंतर काही वेळाने वरच्या मजल्यावरील खोलीत गेला आणि त्याने गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनीही दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *