Home » जळगाव » ३२ वर्षीय तरुणाने घेतला मध्यरात्री टोकाचा निर्णय !

३२ वर्षीय तरुणाने घेतला मध्यरात्री टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

पत्नी माहेरी गेलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास दीपक वसंत पवार (वय ३२, रा. शिवाजी नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगरात दीपक पवार हा तरुण वास्तव्यास असून तो मालवाहू वाहनावर चालक आहे. घरगुती भांडण झाल्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दीपक पवार यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *