अमळनेर : प्रतिनिधी
पैशाची देवाण-घेवाणीच्या भांडणावरून तालुक्यातील जानवे येथे सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारहाण केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बहिरम मंदिराजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव बाबूलाल पाटील व रवींद्र कापडणीस हे बहिरम मंदिराजवळ उभे असताना अचानक दीपक बाबूलाल पाटील त्याठिकाणी लोखंडी फावडे घेऊन आला आणि सुखदेव पाटील यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. यावेळी रवींद्र कापडणीस अडवायला गेले असता त्यांच्याही हाताला दुखापत झाली. त्यांनतर दीपक पाटील याने सुखदेव यांना मारहाण केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलगा भूषण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
