यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात ९ वर्षाच्या बालिकेचा विनयभंग झाल्याचे उघड झाले आहे. वडिलांनी माणुसकीच्या नात्याने दुचाकीवर लिफ्ट दिली. अन् संबंधितानेच बालिकेचा विनयभंग केला. धावत्या दुचाकीवर हे कृत्य घडले. या प्रकरणी यावल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
शनिवारी संध्याकाळी चिंचोली येथील एक व्यक्ती आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत धानोरा येथे गेला होता. परत येताना, दुचाकीवर एक मुलगी पुढे तर ९ वर्षांची दुसरी मुलगी मा बसली होती. त्यावेळी त्यांना धानोरा येथे नंदराज रतन मोरे (वय ५०) हा भेटला सायंकाळची वेळ असल्याने त्याल गावात परत जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नव्हते. यामुळे बालिकेच्य वडिलांनी माणुसकीच्य नात्याने त्याला आपल्य दुचाकीवर लिफ्ट दिली तो ९ वर्षाच्या मुलीच्य मागे बसला होता. त्यावेळ त्याने हे कृत्य केले. घरी आल्यावर मुलीने तिच्य आई-वडील आणि काकाला घडलेल प्रकार सांगितला.
