भुसावळ : प्रतिनिधी
हजरत निजामुद्दीन (दिल्ली) येथून भुसावळला आलेल्या पिता-पुत्राला ऑटो रिक्षावाल्याने निर्जन ठिकाणी नेऊन साथीदारांसह लुटल्याची व मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सात जणांनी मिळून दोन प्रवाशांकडून रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, मोबाइल, तसेच युपीआयद्वारे पैसे हस्तांतर करून खंडणी वसूल केल्याची तक्रार बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, प्रदीप शर्मा व त्यांची पत्नी शालू शर्मा व मुलगा मयंक हे ६ जुलै रोजी हजरत निजामुद्दीनहून भुसावळ येथे आले होते. ७ जुलै रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता प्रदीप शर्मा व मुलगा मयंक हे जेवणासाठी स्टेशनबाहेर गेले असता काळ्या रंगाच्या रिक्षा चालकाने ‘जेवणाच्या चांगल्या ठिकाणी” नेण्याचे सांगून त्यांना रिक्षामध्ये बसवले व वर्दळ नसलेल्या ठिकाणी एका गल्लीत नेऊन साथीदारांना बोलावले. लगेचच दोन दुचाकीवरून चारजण आले व लुटमारीला सुरुवात केली.
यानंतर आणखी दोन दुचाकीवर तीन जण आले व रिक्षाचालकाला पळवून लावले. आरोपींनी प्रदीप शर्मा यांच्याकडून १५,५०० रोख, मोबाईल व दोन सिम काढून घेतले. मयंककडून २५,५०० रोख, कानातील रिंग, चांदीचा ब्रेसलेट व चेन, तसेच आयफोन काढून घेतला.
पीडितांना जंगलान नेऊन दोन जणांन फॉरेस्ट अधिकार असल्याचे भासवल काळ्या हरिणाच्य चामड्याजवळ पीडितांच पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन् ठेवून व्हिडिओ बनवून त्यांच्याव स्मगलिंगचा खोटा आरोप केला. यावेळ आरोपींनी मयंकला मारहाण केली, त प्रदीप शर्मा यांचा गळा दाबला. त्यानंत २ लाखांची मागणी केली. भीतीपोट पीडितांनी नातेवाइकांकडून पेटीएमद्वा ५० हजार रुपये मिळवून दिले, तसेच युपीआयद्वारे ५० हजार रुपये आरोपींच्य खात्यात वर्ग केले.
पोलिसांकडे तक्रार केल्यास जिवे मारू अशी धमकी देऊन पीडितांना सोडून दिले. ते दोघे एक किमी चालत गावात पोहोचले व दिल्लीला रवाना झाले. सुरुवातीस भीतीपोटी तत्काळ तक्रार नोंदवली नाही, मात्र नंतर घटनेची माहिती देत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत
