Home » जळगाव » गिरणा नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू !

गिरणा नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू !

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील वाडे येथील २० वर्षीय तरुण मच्छिंद्र आत्माराम मरसाळे याचा गिरणा नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना १८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे कि, वाडे येथील दत्त मंदिर परिसरात गिरणा नदीच्या पात्रात मच्छिंद्रचा पाय घसरून तो पाण्यात वाहून गेला. गिरणा नदीलगत ठिकठिकाणी नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. १९ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान गिरणा नदीच्या पुलाजवळ मच्छिंद्रचा मृतदेह आढळला. भडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. मच्छिंद्र याच्यावर वाडे येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भडगाव पोलिस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *