यावल : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात असलेल्या पाझर तलावात गणपती विसर्जनसाठी गेलेला तरूण काल दि. ६ रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह आज दि. ७ रोजी सकाळी आकरा वाजता मिळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खालकोट या आदिवासी वस्तीवरील काही तरूण गणपती विसर्जन निमित्त गणेश चतुर्थीच्या दिवशी मनुदेवी मंदिर परिसरात असलेल्या पाझर तलावावर आले होते. यावेळी गणपती विसर्जन करत असताना या तरुणांपैकी रोहिदास शिवराम लहानगे (वय ४२) याचा पाण्यात पाय घसरून तलावात बेपत्ता झाला होता. संध्याकाळी अंधार पडल्याने त्याला शोधता आले नव्हते. दि. ७ रोजी सकाळी त्याचा मृतदेह शोधण्यासाठी कोळन्हावी परिसरातील पट्टीच्या पोहणारेना त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे समजते. तपास पो.हे. किशोर परदेशी करीत आहेत.
