Home » जळगाव » अमळनेर » एसीबीची धडक कारवाई : दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पंटरने घेतली १२ हजारांची लाच !

एसीबीची धडक कारवाई : दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पंटरने घेतली १२ हजारांची लाच !

अमळनेर : प्रतिनिधी 

गॅस भरण्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्ता देण्याची सक्ती करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या पंटरचा लाचखोरीचा डाव अखेर उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही तिन्ही मंडळी १२,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई शहरातील पाचपावली मंदिराजवळ एका पान टपरीवर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील रहिवासी आणि धुळे रोडवरील गॅस भरण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या एका व्यावसायिकाकडे दरमहा १५,००० रुपये हप्ता मागण्यात आला होता. हा हप्ता अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत अमोल राजेंद्र पाटील आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे या दोघांनी मागितला होता. लाच दिली नाही, तर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. शेवटी तडजोड करत १२,००० रुपयांवर सौदा ठरवण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने धुळे येथील ACB कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबर रोजी सापळा रचला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ सप्टेंबर रोजी, पाचपावली मंदिराजवळील पान टपरीवर ठरल्याप्रमाणे १२,००० रुपये घेत असताना एसीबीने ही तिन्ही मंडळी रंगेहात पकडली.

अटक करण्यात आलेले आरोपी – अमोल राजेंद्र पाटील – पोलीस कर्मचारी ,  जितेंद्र रमणलाल निकुंभे – पोलीस कर्मचारी,  उमेश भटू बारी – खाजगी व्यक्ती (पंटर) या तिघांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील चौकशी एसीबीमार्फत केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *