Home » जळगाव » नवरात्र निमित्त दर्शनावर जाताना अपघात : दुचाकीवरील कुटुंब उद्ध्वस्त; मुलगा गंभीर जखमी !

नवरात्र निमित्त दर्शनावर जाताना अपघात : दुचाकीवरील कुटुंब उद्ध्वस्त; मुलगा गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ दि. २६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत जवळपास ५० ते ६० फुटांपर्यंत ओढले. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्याचा हा कुटुंब जळगावमध्ये एका कंपनीत काम करत असून नवरात्र निमित्त इच्छादेवी दर्शनासाठी मुक्ताईनगरला आले होते. दर्शन पूर्ण करून परत जात असताना हा अपघात घडला. दुचाकीचा नंबर २६९५ असून ती डंपरच्या पुढील अॅक्सलला अडकून ओढली गेली. अपघात इतका भयानक होता की मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले. मृतांचा समावेश पती, पत्नी व त्यांची मुलगी यामध्ये आहे, तर सात-आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चालकाला चोप दिला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याशिवाय, संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. मृतांची अधिक तपासणी सुरू असून पोलिस तपास करत आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी वाहनचालकांनी काळजी घ्यावी, अशा सूचनेने भरलेला हा प्रसंग आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *