September 29, 2026 1:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

नवरात्र निमित्त दर्शनावर जाताना अपघात : दुचाकीवरील कुटुंब उद्ध्वस्त; मुलगा गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ दि. २६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत जवळपास ५० ते ६० फुटांपर्यंत ओढले. या अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्याचा हा कुटुंब जळगावमध्ये […]

पूरग्रस्तांवर प्रशासनाचा ठरला ‘नृत्य थांबा’; जिल्हाधिकारी-उपजिल्हाधिकाऱ्यांचा डान्स व्हायरल !

धाराशिव : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात आहेत. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जनावरे मृत्युमुखी पडली आहेत तर अनेक घरं पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. अशा वेळी प्रशासनाकडून तत्पर मदतीची अपेक्षा असते, मात्र धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि […]

‘त्या’ सुसाईट नोटची पडताळणी सुरु : चौकशी होवून कारवाई होणार ?

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रिंगरोड परिसरातील हॉटेल रोनक येथे १४ रोजी मध्यरात्री घडलेल्या हॉटेल चालकाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हॉटेल भाडेतत्त्वावर चालवणारे आशिष मधुकर फिरके (वय ४८) यांनी मध्यरात्री १२.३० ते १ दरम्यान हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गळफास लावून आपले जीवन संपवले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, […]

राज्यातील अनेक भागात तुफान पावसाचा अंदाज !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. यात शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील […]

खळबळजनक : घरातच आढळला अधिकाऱ्याचा मृतदेह !

यावल : प्रतिनिधी फैजपूर रस्त्यावरील पांडुरंग सराफनगरात शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या घरातून गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तेव्हा पोलिसांनी जाऊन पाहिले असता घरात पशुवैद्यकीय अधिकारी यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. दरम्यान ते शनिवारपासून घराच्या बाहेर न आल्यामुळे त्यांचा मृत्यू हृदयविकाराने शनिवारी मध्यरात्रीनंतर झाला असावा असा अंदाज आहे. ते शहरात एकटेच […]

सेवा निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला १९ लाखात फसविले !

भुसावळ : प्रतिनिधी डिजिटल युगात फसवणुकीच्या नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या क्लृप्तीचा वापर करत भुसावळ येथील एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तब्बल १९ लाख ९५ हजार रुपयांहून अधिक रकमेला गंडा घातल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरेश नथ्थुम धांडे (वय […]

शॉक लागला अन खांब्यावरून पडून ३६ वर्षीय ‘वायरमन’चा दुर्दैवी मृत्यू

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यानंतर इलेक्ट्रिक खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. कामावर असताना झालेल्या या अपघातामुळे दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता.धरणगाव) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. दिलीप भिल धरणगाव […]

मुक्ताईनगरात लूटमार करणारी सहा जणांची टोळी अटकेत !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी दुतोंडी साप, कासव व अन्य वन्य प्राण्यांचे तसेच नकली नोटांचे आमीष दाखवत परराज्यातील लोकांना जंगलात बोलावून लुटमार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. पवन दिनेश गौर (रा. आडगाव खुर्द, जि. हरदा), अरविंदकुमार काशीराम राठोड (रा. हरदा), राजेश शंकरलाल साहू (रा. […]

चौघांनी चाकू लावून घरमालकाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी घरमालक ड्युटीला निघताच चार जणांनी चाकू घेऊन घरातून सुमारे दागिन्यांसह दोन लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना अमळनेरात गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पुंडलिक पाटील (रा. अयोध्यानगर, बंगालीफाईल, अमळनेर) हे रेल्वेत नोकरीला आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजता ड्युटीसाठी त्यांनी घर सोडले. काही वेळात त्यांच्या घरात चार […]

आज, तुमच्या कामाच्या वातावरणात बदल होण्याची चिन्हे तुम्हाला मिळतील

मेष राशी आज कामाच्या ठिकाणी अनोळखी लोकांशी वाद घालणे टाळा. अन्यथा समस्या उद्भवू शकते. सामाजिक कार्यात तुम्ही आघाडीवर असाल. राजकीय क्षेत्रात, लोकांना उच्चपदस्थ व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल. वृषभ राशी या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा असेल. स्पर्धा परीक्षेशी संबंधित आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. आर्थिक स्थैर्य राहील. मित्रांसोबत काही आनंदाचे क्षणही घालवाल. मिथुन राशी आज […]

error: Content is protected !!