Home » राष्ट्रीय » राज्यातील विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयोगाची भेट !

राज्यातील विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयोगाची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

चोकलिंगम यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारयादीतील घोळ सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी सर्व विरोधीपक्षाच्या वतीने भेट घेतली. राज ठाकरे यांनी अनेक आणलेली निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ असल्याचे बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. तीच निवडणूक यादी १ जुलैला गोठवून, त्या यादीवर निवडणुका घेतल्या, तर तो गोंधळ पुन्हा चालू होईल, आम्ही याला आक्षेप घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीईओ चोकलिंगम यांनी एकत्रित यावे आणि आमचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आम्ही केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, उद्या ते दोघे एकत्रित येऊन आमचे म्हणणे ऐकतील. आम्ही त्यासाठी सादर केलेले पुरावे त्याची पुन्हा चर्चा होईल. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका घेण्याआधी राज्यातील सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. उद्या सकाळी अकरा वाजता आमची पुन्हा बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पत्रकार परिषद होणार नाही. उद्या आमची बैठकीतील निष्कर्षानंतर ती पत्रकार परिषद होईल. आता तिथे कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चोकलिंगम यांची एकत्र भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ घेतील. त्यामुळे उद्याच पत्रकारांना भेटून माहिती देऊ, असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटून जी मागणी करतोय, अशीच मागणी भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडे करत आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्येही भाजप अशीच मागणी करतोय. त्याच मागणीसाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटत असताना भाजप नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावे, ही आमची भूमिका आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *