September 22, 2026 12:07 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले आहेत; कागदपत्रे आणा, मालकी हक्क मिळवा!

जळगाव : प्रतिनिधी देशभरातील बँका आणि नियामक संस्थांकडे ₹१.८४ लाख कोटी रुपयांची कुणीही दावा न केलेली आर्थिक मालमत्ता आहे. यात जळगाव जिल्ह्यात बँकांमध्ये अंदाजे ३,३०,८७८ दावा न केलेली खाती आहेत, ज्यामध्ये अंदाजे ₹९१.४९ कोटी रुपये दावा न केलेली आहेत. सरकारद्वारे “तुमची भांडवल, तुमचे हक्क” नावाची मोहीम सुरू केली आहे. आरबीआयने “उद्गम” नावाचे एक पोर्टल तयार […]

राज्यातील विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयोगाची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार […]

१५ दिवसांचा वेळ ; मनोज जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा !

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. कळंब तालुक्यातील डिकसळ येथे जरांगे पाटील […]

मोठी बातमी : राज्याच्या मंत्रीमंडळात आज झाले महत्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसह संपली. एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांसह विरोधी नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट देत मतदार याद्यांतील त्रुटींवर बोट ठेवले. दुसरीकडे, मंत्रिमंडळाने बांबू उद्योगाला चालना देणारे धोरण, मुंबई उच्च न्यायालयासाठी […]

उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय : एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकार्‍यांना दिवाळी भेट !

मुंबई : वृत्तसंस्था एसटीच्या सुमारे 85 हजार कर्मचारी व अधिकार्‍यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासह वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचार्‍यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जाहीर केला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची […]

जळगावात तलवार घेवून दहशत माजविणारे दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी धारदार चाकूसह तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या शंतनू चंद्रकांत गुरव (वय २६, रा. पंढरपूरनगर) व कमलेश सुरेश पवार (वय १९, रा. खेडी, ता. जळगाव) या दोघांवर दि. १२ रोजी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरात दि. १२ रोजी दुपारच्या सुमारास संशयित शंतनू […]

बिल्डींगमधील वॉचमनने महिलेच्या घरात घुसून केला चाकू हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी  दिवाळीसाठी पैसे आणि वस्तू हवे असल्याचे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या वॉचमनने आरोही इंद्रकुमार ललवाणी (वय ३८, रा. बालाजी हाईट्स, मोहाडीरोड) या महिलेवर चाकूने वार केले. हल्ला करणारा संशयित गोकुळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) हा पुर्वी त्या बिल्डींगमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होता. ही घटना दि. १३ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या […]

सिनेस्टाईल थरार : वृद्धाची ५० हजारांची बॅग घेवून पसार मुलाला पकडले !

अमळनेर : प्रतिनिधी वृद्धाकडील ५० हजार रुपयांची हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन बॅग मुलाला एका तरुणाने झडप घालून पकडले. ही सिनेस्टाईल घटना अमळनेरच्या पैलाड भागात सोमवारी दुपारी एक वाजता घडली. दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पैलाड येथील तुकाराम भोई यांनी सोमवारी दुपारी बडोदा बँकेतून पन्नास हजार रुपये काढले. मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये पैसे ठेवून घराकडे […]

सकारात्मकता आणि प्रेमाचे हे वातावरण तुमचा आत्मविश्वास वाढणार !

आजचे राशिभविष्य दि.१४ ऑक्टोबर २०२५  मेष राशी मेष राशीवाल्यांनी आज जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याचा विचार करा, किंवा जर तुम्ही अविवाहित असाल तर काही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा विचार करा, कारण आज सामाजिक कार्यक्रम खूप मजेदार असणार आहेत. चिंता सोडा, थोडा वेळ मजेच घालवा, रिलॅक्स वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक रोमांचक आणि सकारात्मक अनुभव घेऊन […]

error: Content is protected !!