Home » राष्ट्रीय » छत्तीसगढमध्ये पुन्हा चकमक : १६ नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी !

छत्तीसगढमध्ये पुन्हा चकमक : १६ नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमकीच्या घटना सातत्याने सुरु असतांना आज पुन्हा एकदा छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. आतापर्यंत या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले, ही संख्या वाढू शकते. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली. केरळपाल परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे कर्मचारी सहभागी आहेत.

दुसरीकडे, याआधी सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले होते की, सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळपाल भागातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक अजूनही सुरू आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *