Home » जळगाव » रामनगर भागात बँडमालकाला जबर मारहाण !

रामनगर भागात बँडमालकाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी 

वाजंत्री वाजविण्याची वेळ संपल्याने बंद केलेला बँड पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्याने बँडमालक अमोल लक्ष्मीकांत पवार (२६, रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) यांच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करण्यात आला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवरदेवासह दोन ते तीन जणांविरुद्ध २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की ,  मेहरुण परिसरामधील रामनगर भागातील शंकर अशोक काळे यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी अमोल पवार यांची वाजंत्री लावलेली होती. रात्री १० वाजल्याने नियमानुसार त्यांनी वाजंत्री वाजविणे बंद केले. त्यावेळी नवरदेव शंकर काळे याच्यासह दोन ते तीन जणांनी आम्हाला नाचायचे असून, पुन्हा बँड सुरू करा, असे सांगितले. त्यावेळी वेळ संपल्याचे सांगत बँड मालकाने नकार दिला. त्याचा राग आल्याने नवरदेव व त्याच्यासोबतच्या मंडळींनी वाद घालून शिवीगाळ केली. त्यातील एका जणाने काहीतरी धारदार वस्तू बँडमालकाच्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच तू जर बँड वाजविला नाही, तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *