Home » जळगाव » अमळनेर » बापरे : पैसे न दिल्याने भाच्याची आत्याला जबर मारहाण!

बापरे : पैसे न दिल्याने भाच्याची आत्याला जबर मारहाण!

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील ख्वाजा नगर परिसरात मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यासाठी आत्या हलीमा बी अब्दुल रशीद, रा. ख्वाजानगर हिने पैसे दिले नाहीत, म्हणून तिचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिला मारहाण केली. तिच्या डोक्यात पकड मारली. त्यात आत्या जखमी झाली आहे. या प्रकरणी दि. १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिलेकडे तीच्या भाचा पिंजारी याने पैसे मागितले. त्यावर महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतरही तीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने महिलेला मारहाण केली. महिलेच्या वडिलांनी भांडण सोडवत तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले होते.

उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८ (१), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईल मधील एका ऑनलाईन गेम साठी पैसे मागत असल्याचे आरोपीने सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास हेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत. ऑनलाईन गेमसाठी पैसे मागितले मात्र ने न मिळाल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *