जळगावातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मेहरूण तलावात आढळला ; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप !

जळगाव : प्रतिनिधी तरुण दोन दिवसांपासून शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल चौक येथे राहणारा २१ वर्षीय तरुण बेपत्ता होता. आज (शनिवार, दि. २० सप्टेंबर) सकाळी त्याचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास […]
मोठी बातमी : एसटी महामंडळात होणार तब्बल १७ हजार जागांची भरती !

मुंबई : वृत्तसंस्था सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी महामंडळात तब्बल 17 हजार जागांची भरती होणार आहे. या जागा चालक व सहाय्यकाच्या आहेत. त्यासाठी स्वतः एसटीच पात्र उमेदवारांना प्रशिक्षण देणार आहे. विशेषतः या पदासांसाठी दरमहा 30 हजार रुपयांपर्यंतचे मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे परिवहन […]
‘संजय राऊत यांना घरात घुसून मारू, शिंदेंच्या आमदाराची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी आनंद दिघेंचा फोटो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी लावण्यावर आक्षेप घेतला होता. यावरून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी ‘संजय राऊत यांना घरात घुसून मारू,’ अशी उघडपणे धमकी दिली होती. आमदार राजेश मोरे यांच्या या धमकीनंतर आता मोठा […]
दगडफेकप्रकरणी खळबळ : भाजपच्या मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, आज (दि. २० सप्टेंबर) दुपारी महायुती सरकारमधील भाजप नेते व मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर अज्ञात तरुणाने दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना पुंडलिकनगर येथील त्यांच्या कार्यालयासमोर घडली असून, गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारास मंत्री अतुल सावे हे आपल्या पुंडलिकनगर […]
नव्या वादाला फुटले तोंड : शिंदेंच्या खासदाराची जीभ घसरली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका करताना राजकीय स्तर घसरल्याचं दिसत आहे. नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना किमान शब्दांचे भान वापरले गरजेचे आहे. पण तसं होताना दिसत नाही. दिवसेंदिवस एकमेकांवर टीका करताना भाषेचा स्तर घसरत चाललेला आहे. नुकतचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष […]
बापरे : पैसे न दिल्याने भाच्याची आत्याला जबर मारहाण!

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील ख्वाजा नगर परिसरात मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यासाठी आत्या हलीमा बी अब्दुल रशीद, रा. ख्वाजानगर हिने पैसे दिले नाहीत, म्हणून तिचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिला मारहाण केली. तिच्या डोक्यात पकड मारली. त्यात आत्या जखमी झाली आहे. या प्रकरणी दि. १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिलेकडे […]
खळबळजनक : म्हशी चारण्यासाठी गेलेला युवक नदीत बेपत्ता !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सिंगारबर्डी (ता. भुसावळ) येथील लक्ष्मण वसंत ठाकरे (वय सुमारे २५-३०) हा युवक वाघूर नदीत वाहून गेला. शोधकार्य रात्रीपर्यंत सुरुच होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लक्ष्मण ठाकरे म्हशी चारण्यासाठी वाघूर नदीवरील जुन्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेला होता. काही वेळाने म्हशी […]
तरुणीला अश्लील कमेंट्स करून त्रास देणाऱ्या तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला सतत अश्लील कमेंट्स करून त्रास देणाऱ्या तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पीडितेच्या नातेवाइकासह त्याच्या मित्रालादेखील मारहाण करून दुखापत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत महाविद्यालयाच्या मैदानावर बॅडमिंटन खेळत असताना, आरोपी प्रणय गणेश निहारे, आदिल खान मुकीम खान […]
नदीत पाय घसरून नात गेली वाहून अन आजोबांचा दुर्देवी मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यात झालेल्या पावसामुळे सर्वच नदीला पाणी आले आहे. तर तालुक्यातील वडगाव टेक येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लहानपणीच पितृछत्र हरपलेले… आई मजुरीसाठी बाहेरगावी गेलेली… अशातच आजोबांकडे (आईचे वडील) राहणारी १४ वर्षीय मुलगी हिवरा नदीत पाय घसरून पडल्याने वाहून गेली. या धक्क्यामुळे तिचे पालनकर्ता असलेल्या […]
या राशीतील व्यक्तींनी आज अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळावे.

आजचे राशिभविष्य दि.२० सप्टेंबर २०२५ मेष राशी आरोग्याच्या दृष्टीने, तुम्हाला ताजेतवाने वाटेल. रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हा दिवस फायदेशीर वाटेल. आयटीच्या विद्यार्थ्यांना आज नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन नियोजन करून काम कराल. तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे व्यवसायाचे कामकाज सुरळीत होईल. तुमच्या रेस्टॉरंट व्यवसायातही तुम्हाला लक्षणीय नफा मिळेल, ज्यामुळे […]