Home » राष्ट्रीय » सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती स्वस्त !

सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती स्वस्त !

मुंबई : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत लोकांना दिलासा दिला. घरातील दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी काढून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला. जीएसटी काढला गेल्याने वस्तू थेट स्वस्त झाल्या. सरकारने जीएसटी सुधारणांच्या घोषणेनंतर आता परिणाम दिसून येतोय.

मदर डेअरीने मंगळवारी दुधाच्या किंमतीत कपात केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत, परंतु त्यापूर्वीच कंपनीने त्यांच्या पॅकेज्ड दुधाच्या किंमती प्रति लिटर दोन रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. आता मदक डेअरीने 1 लिटर दुधाची किंमत 77 वरून 75 रुपये केलीये. हेच नाही तर यासोबतच पनीर आणि तुपाचीही किंमत कमी केलीये.

सरकारने 3 सप्टेंबर रोजी जीएसटी सुधारणांची घोषणा केली आणि त्यानंतर निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेऊन नेमक्या कोणत्या वस्तूंवरील जीएसटी काढला जाईल , कोणत्या वस्तूंवरील कमी होईल हे स्पष्ट सांगितले. घरगुती लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी काढण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला. नवीन नियमांसह सर्व उत्पादनांवर ग्राहकांना 100 टक्के कर सवलत देण्यासाठी मदर डेअरीने आता हे पाऊल उचलल्याचे बघायला मिळतंय.

200 ग्रॅम पनीरचे पॅकेट 95 रुपयांऐवजी 92 रुपयांमध्ये मिळेल. 500 ग्रॅम बटर 305 रुपयांऐवजी 285 रुपयांना मिळेल.  तर 100 ग्रॅम बटर 62 रुपयांऐवजी 58 रुपयांना मिळेल. तूपाच्या 1 लिटर पॅकची किंमत 675 रुपयांवरून 645 रुपये करण्यात आली आहे. 1 लिटर तुपाच्या पॅकची किंमत 750 रुपयांवरून 720 रुपये प्रति लिटर 30 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळालाय. मागील काही दिवसांपासून लोकांची एक ओरड होती की, सतत सीएसटीमुळे वस्तूंवरील दर वाढत आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला जातोय. शेवटी आता मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *