Home » जळगाव » चाळीसगाव » कारची बैलगाडीला जबर धडक : दोन बैल जखमी !

कारची बैलगाडीला जबर धडक : दोन बैल जखमी !

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कोठली फाट्याजवळ एका कारने बैलगाडीला दिलेल्या जबर धडकेत बैलगाडी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही बैल ही जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या बैलगाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटना श-क्रवारी घडली होती. या प्रकरणी जखमी चालकाच्या काकांच्या फिर्यादीवरुन कारचालकावर नोंदवण्यात आला आहे. गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव ते चाळीसगाव मार्गादरम्यान कोठली फाटानजीक असलेल्या हॉटेल वैभवजवळ मारुती कंपनीची कार (एमएच-०२, बीआर- १६०१) ने भरधाव वेगवाने बैलगाडीस धडक दिली. या अपघातात तालुक्यातील कोठली येथील बैलगाडी चालक विजय धनराज पाटील (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांचे दोन्ही बैल ही जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या बैलगाडीचे मोठे नुकसान झाल्याची ही घटना १८ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली होती.

याबाबत जखमी विजय पाटील यांचे काका रवींद्र दौलत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज कारचालक व पुण्यातील निगडी येथील सुधीर कुमार नारायण पाटील याच्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक फौजदार संजय पाटील करत आहेत. दरम्यान, या अपघातात विजय पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरुवातीस भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर विजय पाटील यांना पुढील उपचारासाठी चाळीसगावहून धुळे व नंतर नाशिक येथे हलवण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *