जळगाव मनपाची नालेसफाई फक्त कागदावर? २५ लाखांचा टेंडर ?, पण काही नाले अजूनही घाणीतच !

जळगाव : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी पाच मुख्य नाले व १०२ उपनाल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांतील उपनाल्यांची साफसफाई झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे दिसत नसल्याने, ही मोहीम केवळ कागदापुरती मर्यादित राहिली आहे का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. महापालिकेने मे व जून महिन्यांत ठेकेदाराच्या माध्यमातून ही मोहीम राबवली […]
आईच्या नावाने डान्सबार चालवता, लाज वाटत नाही?” ; अनिल परब यांचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. मुंबईतील कांदिवली येथील ‘सावली’ डान्सबार हा योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर […]
संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन अन आ.पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड पुलाचे काम मंगळवारी आज दि. २२ जुलै सकाळी पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना अडवले आणि काहींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली. प्रांताधिकाऱ्यांनी महामार्गाचे […]
लोढाचे पाय आणखी खोलात : ३६ वर्षीय महिलेने दिली बावधन पोलिस ठाण्यात तक्रार !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यापासून राज्यात हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीवर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. आता लोढा याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे […]
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला असून, आरोग्यविषयक कारणास्तव आपण पदत्याग करत असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना […]
कारची बैलगाडीला जबर धडक : दोन बैल जखमी !

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोठली फाट्याजवळ एका कारने बैलगाडीला दिलेल्या जबर धडकेत बैलगाडी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही बैल ही जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या बैलगाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटना श-क्रवारी घडली होती. या प्रकरणी जखमी चालकाच्या काकांच्या फिर्यादीवरुन कारचालकावर नोंदवण्यात आला आहे. गुन्हा मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव […]
पारोळ्यात खळबळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती : एका विरोधात गुन्हा दाखल !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यात १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची घटना उघडकीस आली असून पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना तिची पारोळा बसस्थानकावर […]
शुभांगी नाईक मृत्यू प्रकरण : पतीविरोधात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी मेहरुण परिसरातील शुभांगी कुणाल नाईक या मृत्यूप्रकरणी विवाहितेच्या तिचा पती कुणाल रवींद्र नाईक (रा. मेहरुण) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण परिसरातील शुभांगी नाईक या विवाहितेने शनिवारी (१९ जुलै) दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला […]
एलसीबीची कारवाई : पोलिसांनी पाठलाग करीत पकडला ८ किलो गांजा !

अमळनेर : प्रतिनिधी गलंगी ते चोपडा दरम्यान दोन जणांचा पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ किलो १३० ग्रॅम वजनाच्या गांजसह २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना २० रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींचे नावे उदयभान संजय पाटील (२१) रा. चांग्या निमजवळ […]
तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पदावरून काढून टाकले जाऊ शकते.

आजचे राशिभविष्य दि.२२ जुलै २०२५ मेष राशी आज तुमचे अशांत असेल आणि कशाचाही उत्साह वाटणार नाही. तुम्हाला काम करण्याची इच्छा होणार नाही. तुम्ही आळसाला बळी पडू शकता. कामाच्या ठिकाणी आळस आणि निष्काळजीपणा टाळा. नोकरीत बदलीची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पदावरून काढून टाकले जाऊ शकते. किंवा दूरच्या प्रवासाला पाठवले जाऊ शकते. वृषभ राशी आज तुम्हाला […]