Home » जळगाव » चोरी करताना सापडले अन महिलेसोबत केले अश्लील वर्तन !

चोरी करताना सापडले अन महिलेसोबत केले अश्लील वर्तन !

जळगाव : प्रतिनिधी

गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात शिरुन भरलेले गॅस सिलींडर चोरी करतांना हटकले असता, महिलेसोबत चौघांनी अश्लिल वर्तन करीत विनयभंग केला. ही घटना दि. १४ रोजी दुपारी १२ वाजता शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात ५८ वर्षीय महिला वास्ताव्यास आहे. दि. १४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयित महादू चवंडके, राकेश चवंडके, अक्षय चवंडके यांच्यासह एक महिला (सर्व रा. नाशिक) हे बनावट चावीच्या सहाय्याने महिलेच्या घरात शिरले. त्यांनी कपाट उघडून ते भरलेले गॅस सिलींडर चोरुन नेत असतांना, महिलेने त्यांना हटकले. यावेळी त्या संशयितांनी महिलेला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. दरम्यान, महिलेने तात्काळ जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोहेकॉ वंदना चव्हाण या करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *