Home » ताज्या » सीबीआयची बतावणी करून ३१ लाखात फसविले !

सीबीआयची बतावणी करून ३१ लाखात फसविले !

चाळीसगाव : प्रतिनिधी

दिल्ली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत एका अज्ञात व्यक्तीने चाळीसगाव येथील ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश बाबुलाल शिंपी (७३, फुले कॉलनी, चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. १६ ते २३ जून २०२५ या कालावधीत सुनील कुमार नावाच्या एका व्यक्तीने शिंपी यांच्याशी मोबाइलवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल आणि चॅटद्वारे संपर्क साधला. या भामट्याने शिंपी यांना ‘तुमचे बैंक खाते मनी लॉड्रिंगसाठी वापरले जात आहे,’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सीबीआय आणि दिल्ली पोलिस बोलत असल्याचे भासवून, त्याने शिंपी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रकाश शिंपी यांनी फिर्याद दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *