Home » महाराष्ट्र » माझ्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नका, कारण…राज ठाकरेंचे पत्र व्हायरल !

माझ्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नका, कारण…राज ठाकरेंचे पत्र व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातील प्रत्येक व्यक्ती वाढदिवस साजरा करीत असतो मात्र दरवर्षी मनसे समर्थक राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत असता मात्र यंदा मनसे सैनिकांना राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करता येणार नाही आहे. त्याचे कारण असे कि, राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दोन दिवसापूर्वी एक मनसे सैनिकांना पत्र लिहले असून हे पत्र सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहे.

राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे….

”तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र!

येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिक्शी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजय का करणार नाहीये? काही विशेष कारण आहे का? इत्यादी… पण मनापासून सांगतोय की बरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.

गेली अनेक दशके माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळेजणं येता. तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही. पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट ही ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढेदेखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!

पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.

माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन.

त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.”

आपला नम्र

राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *