मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. राजकुमार शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक श्री. नागेश मोहिते यांनी आयोजित केला होता.
राजकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यात 33 वर्षे निष्ठेने सेवा बजावत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आपल्या भाषणात त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा आणि आई-वडिलांची सेवा करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक नागेश मोहिते बोदवड पोलीस निरीक्षक श्री. अरविंद भोळे, सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील. निलेश गोसावी. राजेंद्र चाटे सहाय्यक उपनिरीक्षक नजन पाटील. रीडर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र खनके.साहेब. साहेब .मराठा सेवा वस्तीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम साहित्यिक अ. फ. भालेराव, न्यू मुक्ताई इलेक्ट्रॉनिक संचालक श्रीकांत पाटील.जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर. चौधरी पत्रकार विलास पाटील . आणि घरात पुण्यनगरी चे वार्ताहर छबीलदास पाटील.आदी मान्यवर उपस्थित होते. चौधरी यांनी रमजान महिन्यात गरीब आणि गरजूंना साहाय्य करण्यासाठी शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी शिंदे यांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना सांगितले की, त्यांनी कठोर शिस्त आणि ताठ कण्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला. बोदवडचे श्री. भोळे यांनीही शिंदे यांच्या वेळेच्या काटेकोर वापराचे आणि शिस्तप्रिय स्वभावाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहन मेढे यांनी केले. शिंदे यांच्या पत्नीनेही आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. शेवटी, राजकुमार शिंदे यांनी मुक्ताईनगर आणि परिसरातील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व मुक्ताईनगर व बोदवड. सावदा. येथील कर्मचारी रुंद आदी उपस्थित होते
