Home » जळगाव » चोपडा » पारोळ्यात खळबळ : महिलेचा खून करून मृतदेह भरला गोणीत !

पारोळ्यात खळबळ : महिलेचा खून करून मृतदेह भरला गोणीत !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे कि, सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. तसेच तिचे हातपाय बांधलेले अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे.

हा परिसर अमळनेर व पारोळा तालुक्याला लागून असल्याने घटनास्थळी आधी अमळनेर पोलिस पोहोचले. त्यानंतर ही घटना पारोळा तालुक्याच्या हद्दीत असल्याची खात्री झाली. रात्री दहा वाजल्यानंतर पारोळा येथील पोलिस उपनिरीक्षक अमरदीप गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित पाटील, सुनील हटकर यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. या महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *