April 26, 2025 2:41 pm

Home » गुन्हे » ममुराबादनजीक भीषण अपघात : महाविद्यालयीन विद्यार्थी ठार !

ममुराबादनजीक भीषण अपघात : महाविद्यालयीन विद्यार्थी ठार !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथील अरूणामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दुचाकीने जात असलेल्या दोन जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने फार्मसी महाविद्यालयातील तरूण हा जागीच ठार झाला तर त्याचा सोबतचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत फैसज पटेल हा तरूण आपल्या आईवडील व मोठे काका यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो ममुराबाद येथील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी-फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फैसल हा त्याचा मित्र वासीक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला जात होता. त्यावेळी ममुराबाद आणि जळगाव दरम्यानच्या रस्त्यावरून जात असतांना समोरून विटाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १३ एएन ४४४५) जोरदार धडक दिली. या वाहनात विटा भरलेले होते. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला वासीक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. दरम्यान फैजल हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे दिसून आले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *