Home » राष्ट्रीय » माजी खेळाडू केदार जाधव भाजपात दाखल !

माजी खेळाडू केदार जाधव भाजपात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

इंडियाच्या टीममध्ये माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधवने नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. तो आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. त्याने मंगळवारी (8 एप्रिल) मुंबईमध्ये भाजपचे कमळ हाती घेऊन पक्ष प्रवेश केला. पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे, पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. केदारने काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर केदारच्या राजकारणामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

केदार जाधवने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण नोव्हेंबर 2014 मध्ये रांची येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून केले. त्यावेळी एमएस धोनी हा कर्णधार होता. त्यानंतर त्याने 2014 ते 2020 पर्यंत भारतासाठी 73 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांत त्याने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या. यादरम्यान, दोन शतके आणि सहा अर्धशतके फटकावली. तर तसेच अर्धवेळ गोलंदाजी करताना 5.15 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेतल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तो फक्त एक अर्धशतक करू शकला. 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्याने पाच वेगवेगळ्या संघांसाठी आपली ताकद दाखवली. 95 आयपीएल सामन्यांपैकी 81 डावात 1208 धावा केल्या. त्याने चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याची आयपीएल कारकीर्द 2009 ते 2023 पर्यंत चालली. जाधव 2010 मध्ये कोची टस्कर्स केरळकडूनही खेळला.

पुण्यातील इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील अप्रतिम खेळीसाठी केदार जाधवला आठवले जाते. 2017 मध्ये मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 351 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि अर्धा संघ 63 धावांवर बाद झाला. त्यानंतर जाधवने जबाबदारी घेतली आणि 76 चेंडूत 120 धावा केल्या. त्याने विराट कोहली (122 धावा) सोबत 200 धावांची भागीदारी केली आणि भारताला 11 चेंडू शिल्लक असताना इजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *