September 24, 2026 7:46 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मंत्रीमंडळात महत्वाचा निर्णय : राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल. विशेषतः ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही, त्या ठिाकणी स्थानिक ग्रामपंचायतींनाही पुढील कारवाई करावी लागेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी […]

माजी खेळाडू केदार जाधव भाजपात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था इंडियाच्या टीममध्ये माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधवने नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. तो आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. त्याने मंगळवारी (8 एप्रिल) मुंबईमध्ये भाजपचे कमळ हाती घेऊन पक्ष प्रवेश केला. पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे, पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. केदारने काही दिवसांपूर्वी […]

राज्यात पुन्हा एकदा मराठी-हिंदी वाद पेटणार ? मनसे पक्षाची मान्यता होणार रद्द ?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठी भाषेसंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार मनसैनिकांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी फलक तसेच मराठी भाषा वापरण्यास मनसेच्या पद्धतीने विनंती केली होती. त्यानंतर मनसेने आता मुंबई मेट्रोकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसत आहे. मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो स्थानाकाबाहेरील फलकावर इंग्रजी भाषेत नाव […]

…तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान झाले असते ; मंत्री आठवले !

जळगाव : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले  हे सध्या जळगाव दौऱ्यावर आले असतांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी “संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले […]

कुणाल कामरा प्रकरण : मुंबई पोलिसासह आमदारांना बजावली हायकोर्टाने नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून कुणाल कामरा यांच्या कॉमेडीमुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता त्यात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. या प्रकरणी दाखल करण्‍यात आलेला गुन्‍हा रद्द करण्याची मागणी कामराने मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडे केली हाेती. या प्रकरणी न्‍यायालयाने आज (दि.८) मुंबई पोलिस आणि गुन्हा दाखल […]

लाडक्या बहिणींची संख्या घटणार की वाढणार?

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सरकारने ‘लाडकी बहिण’ योजना सुरु केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत हि योजना गेमचेंजर ठरत महायुतीला मोठे यश आले होते. त्याच बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्याचा जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार […]

जयपूरमध्ये चारचाकीचा थरार : ९ जणांना चिरडले : महिलेसह तिघांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना एक भयानक अपघाताची घटना जयपूर शहरातून समोर आली आहे. एका हाय स्पीड एसयूव्ही कारने रस्त्यावर धुमाकूळ घातला.. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या भागात ७ किमी वेगात एसयूव्ही चालवली.अनियंत्रित कारने प्रवास करणाऱ्या 9 जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. तर […]

बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी डॉक्टराला घेतल्या ताब्यात !

जळगाव : प्रतीन्दीही भंगार विक्रेत्याकडून जप्त केलेल्या नकली नोटा प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली होती. तर या बनावट नोटांचे कनेक्शन हे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुरपर्यंत पोहचले होते. जिल्हापेठ पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता, मात्र ते पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र बनावट नोटांचे सिंडीकेट चालविणाऱ्या डॉ. प्रतिक सुरेश नवलखे (वय ४३, रा. बऱ्हाणपूर, […]

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून पडल्याने सुरेश सीताराम आदवासी (वय ३०, रा. सेल्हा, जि. पन्ना, मध्यप्रदेश) या परप्रांतीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. ६ एप्रिल रोजी शिरसोली ते जळगाव दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशात राहणारा सुरेश आदवासी हा तरुण नाशिक […]

बापरे : महिला प्राचार्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वाहनचालकाने केला अत्याचार !

चाळीसगाव : प्रतिनिधी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत प्राचार्य असलेल्या महिलेवर वाहन चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच त्या महिलेकडून ३ लाख ३० हजार रुपये उकळले असून याप्रकरणी मध्यप्रदेशातील राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावात रहीवास असलेल्या ३५ वर्षीय […]

error: Content is protected !!